नागोठणे सरपंच झालो त्यापेक्षा लायन्स क्लबचा अध्यक्ष झालो याचा अधिक आनंद – अध्यक्ष विलास चौलकर स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने लायन्स क्लबचा सेवाभावी उपक्रम

नागोठणे सरपंच झालो त्यापेक्षा लायन्स क्लबचा अध्यक्ष झालो याचा अधिक आनंद – अध्यक्ष विलास चौलकर स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने लायन्स क्लबचा सेवाभावी उपक्रम

नागोठणे रायगड (शामकांत नेरपगार) : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून नागोठणे लायन्स क्लबच्या वतीने स्व. बाळासाहेब ठाकरे बालोद्यान, शांतीनगर, नागोठणे येथील लायन्स क्लब कार्यालयात विविध सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात लायन्स क्लबचे अध्यक्ष लायन विलास चौलकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करून करण्यात आली.


  स्वातंत्र्य दिनानिमित्त लायन्स क्लबच्या वतीने गरजू व्यक्तींना भांडी, ब्लॅंकेट आणि छत्र्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपत गरजू नागरिकांना मदतीचा हात देण्यात आला.
यावेळी बोलताना लायन्स क्लबचे अध्यक्ष विलास चौलकर म्हणाले, “लायन्स क्लबच्या माध्यमातून नागोठणे गावासह परिसरातील नागरिकांची सेवा करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करीन. भारत देश स्वतंत्र होण्यासाठी अनेक क्रांतिकारक आणि देशभक्तांनी बलिदान दिले. अनेक चळवळी उभ्या राहिल्या. त्या हुतात्म्यांमुळेच आपण आज स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत.”
              पुढे ते म्हणाले, “मी नागोठणे सरपंच झालो त्यापेक्षा लायन्स क्लबचा अध्यक्ष झालो याचा मला अधिक आनंद आहे. कारण लायन्स क्लबच्या माध्यमातून अधिकाधिक जनसेवा करण्याचे भाग्य मला मिळत आहे. नागोठणे विभागात एकही कॅन्सर रुग्ण आढळता कामा नये, यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार असून नागोठणे कॅन्सरमुक्त करण्याचा माझा मानस आहे.”
    यावेळी लायन्स क्लब अध्यक्ष लायन विलास चौलकर, उपाध्यक्ष एमजेएफ लायन सुधाकर जवके, चार्टर्ड प्रेसिडेंट लायन प्रकाश जैन, एमजेएफ लायन यशवंत चित्रे, एमजेएफ लायन विवेक सुभेकर, सचिव लायन डॉ. अनिल गीते, लायन दौलत मोदी, लायन सखाराम ताडकर, लायन पांडुरंग शिंदे, लायन विजय शहासने, लायन सुनील कुथे, लायन दीपक लोणारी, लायन पप्पू करडे, लायन रतन हेंडे, लायन ॲड. महेंद्र धामणे, लायन विद्या म्हात्रे, ॲड. स्मिता कुथे, जगदीश दिवेकर, रोहिदास हातनोलकर, रविंद्र वाजे, नजमोद्दीन ओहरा यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!