किशोरभाई जैन मित्र मंडळाच्या दहीहंडी उत्सवासाठी नव्या कार्यकारिणीची निवड अध्यक्षपदी ॲड. रमेश जाधव; दहीहंडी उत्सवाच्या तयारीला वेग

किशोरभाई जैन मित्र मंडळाच्या दहीहंडी उत्सवासाठी नव्या कार्यकारिणीची निवड
अध्यक्षपदी ॲड. रमेश जाधव; दहीहंडी उत्सवाच्या तयारीला वेग

नागोठणे रायगड (शामकांत नेरपगार ) — नागोठणे शहरातील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते किशोरभाई जैन मित्र मंडळ दहीहंडी उत्सव २०२६ च्या आयोजनासाठी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे. यामध्ये अध्यक्षपदी ॲड. रमेश जाधव, उपाध्यक्षपदी अर्चित भिसे, सचिवपदी मंदार मोरे तर खजिनदारपदी घनश्याम ताडकर यांची निवड करण्यात आली.
                 दहीहंडी उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी कार्यवाहक म्हणून मनोज टके, धनंजय जगताप, जितेंद्र जाधव, ॲड. प्रकाश कांबळे व सुरेश गिजे यांची निवड करण्यात आली. तसेच सदस्य म्हणून रोशन गुरव, केतन भोय, ऋषिकेश कारखानीस, भावेश खंडागळे, महेंद्र नागोठणेकर, सिद्धार्थ गिजे, मनीष पवार व राजेश पिंपळे यांची निवड करण्यात आली.
                 कार्यकारिणीची निवड झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते किशोरभाई जैन यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष ॲड. रमेश जाधव व त्यांच्या संपूर्ण टीमचे स्वागत करून आगामी दहीहंडी उत्सवासाठी शुभेच्छा दिल्या. नागोठणे शहरातील दहीहंडी उत्सवाची परंपरा व उत्साह कायम ठेवत यंदाचा उत्सव अधिक भव्य आणि आकर्षक करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
यावेळी प्रियदर्शनी वाहतूक संस्थेचे अध्यक्ष शैलेश रावकर, नागोठणेचे माजी उपसरपंच मोहन नागोठणेकर, बबलू खंडागळे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
               नागोठणे परिसरातील नागरिकांचे विशेष आकर्षण असलेल्या या दहीहंडी उत्सवाची तयारी नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून सुरू झाली असून, यंदाच्या उत्सवाकडे नागोठणेकरांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!