रोह्यातील मेहेंदळे हायस्कूलमध्ये विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी

रोह्यातील मेहेंदळे हायस्कूलमध्ये विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी

वाकणनाका (सुनिल कोकळे):

रोहा येथील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या मेहेंदळे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात मंगळवार दि. १४ एप्रिल रोजी विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

सदर कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ठिक ८ वाजता शासकीय नियमांचे पालन करून करण्यात आली. यावेळी प्राचार्य रमेश मोसे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला व अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी सकाळ सत्र प्रमुख नारायण पानसरे, संग्राम गायकवाड तसेच दुपार सत्र प्रमुख किशोर पाटील, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(नील पिंपळे व सलोनी काळे यांचे भेटवस्तू देऊन कौतुक करताना प्राचार्य रमेश मोसे)

कार्यक्रमादरम्यान समिता वाघमारे व सुविनयकुमार अहिरे यांनी प्रतिमेसमोर प्रार्थना सादर केली. तसेच इयत्ता ११ वीचा विद्यार्थी नील पिंपळे आणि ८ वीतील विद्यार्थिनी सलोनी काळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर भाष्य करताना भारतीय राज्यघटनेचे महत्त्व विशद केले.

यावेळी विद्यार्थ्यांना डॉ. आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळे सर्व नागरिकांना कायद्यापुढे समानता, धर्म, जात, लिंग यावर आधारित भेदभावाला मनाई, तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य, शिक्षण व समान संधी यांसारखे मूलभूत अधिकार प्राप्त झाले असल्याची माहिती देण्यात आली. विविधतेत एकता राखत सर्वांना न्याय, समता व बंधुता या मूल्यांवर आधारित समाज उभारण्याचा संदेशही यावेळी देण्यात आला. शाळेतील कलाशिक्षक सुनिल दाभाडे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे सुंदर चित्र रेखाटले व ते सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र बनले.हा कार्यक्रम उत्सहापुर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व कर्मचारी विनोद वाघमारे व प्रज्योत पाटील यांनी मेहनत घेतली.

(कलाशिक्षक सुनिल दाभाडे यांनी फळ्यावर साकारलेले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे सुंदर चित्र)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!