गुरुकुल राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षेत रायगडचा दबदबा : इस्रो संशोधन भेटीसाठी रायगड जिल्ह्यातील ४ विद्यार्थ्यांची निवड; जिल्हा परिषदेत सत्कार

गुरुकुल राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षेत रायगडचा दबदबा :
इस्रो संशोधन भेटीसाठी रायगड जिल्ह्यातील ४ विद्यार्थ्यांची निवड; जिल्हा परिषदेत सत्कार

नागोठणे (शामकांत नेरपगार ) – गुरुकुल राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत रायगड जिल्ह्यातील चार गुणवंत विद्यार्थ्यांची इस्रो संशोधन भेटीसाठी निवड झाल्याने जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या विद्यार्थ्यांचा नुकताच रायगड जिल्हा परिषद, अलिबाग येथे शिक्षण व आरोग्य सभापती वैकुंठशेठ पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
इस्रो संशोधन भेटीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये कु. सार्थक सुहास माने (इयत्ता ७ वी, सिकेटी इंग्लिश मिडीयम स्कूल, न्यू पनवेल), कु. विनीत विनोद कापसे (इयत्ता ८ वी, द. ग. तटकरे माध्यमिक विद्यालय, कोलाड), कु. साई योगेश म्हात्रे (इयत्ता ७ वी, रा. जि. शाळा पिगोंडे, नागोठणे) व कुमारी शुभ्रा सुधीर शिंदे (इयत्ता ७ वी, ग. बा. वडेर हायस्कूल, पाली) यांचा समावेश आहे.
यावेळी सभापती वैकुंठशेठ पाटील यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच भाजपा रोहा तालुका शिक्षण सेल प्रमुख अशोक अहिरे व त्यांच्या संपूर्ण टीमच्या कार्याचेही कौतुक केले.

या सत्कार समारंभास भाजप नेत्या गीता पालरेचा, जिल्हा उपाध्यक्षा श्रेया कुंटे, भाजप रोहा तालुका अध्यक्ष महेश ठाकुर, रोहा तालुका शिक्षण सेल प्रमुख अशोक अहिरे, रोहा महिला मोर्चा अध्यक्षा अपर्णा सुटे, सोनाली पडवळ, पल्लवी माने, अनिल वाघ, सोशल मीडिया तालुका अध्यक्ष अनिल खंडागळे, तसेच संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व पालक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!