रिलायन्स अध्यक्षांकडून कामगार नेते संजय काकडे यांचा गौरव; नागोठणेकरांसाठी अभिमानाची बाब – किशोरभाई जैन संजय काकडे यांच्या सेवापुर्ती समारंभा प्रसंगी मान्य वरांकडून कौतुकाचा वर्षाव

रिलायन्स अध्यक्षांकडून कामगार नेते संजय काकडे यांचा गौरव; नागोठणेकरांसाठी अभिमानाची बाब – किशोरभाई जैन

संजय काकडे यांच्या सेवापुर्ती समारंभा प्रसंगी मान्य वरांकडून कौतुकाचा वर्षाव

नागोठणे (शामकांत नेरपगार) : नागोठणे येथील रिलायन्स कंपनीत तब्बल ३६ वर्षे ६ महिने प्रामाणिकपणे सेवा बजावून सेवानिवृत्त झालेल्या कामगार नेते तथा भारतीय श्रमिक संघाचे अध्यक्ष संजय काकडे यांच्या सेवापूर्ती व सत्कार समारंभात रिलायन्स कंपनी नागोठणे युनिटचे अध्यक्ष शशांक गोयल यांनी उपस्थित राहून त्यांचे विशेष कौतुक केले. हा गौरव नागोठणेकरांसाठी अभिमानास्पद असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व नागोठणे भारतीय एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष किशोरभाई जैन यांनी व्यक्त केले.
रविवार, दि. ३१ मे २०२६ रोजी सायंकाळी रिलायन्स टाऊनशिपमधील वृंदावन सभागृहात अतिशय कौटुंबिक वातावरणात हा सेवापूर्ती समारंभ पार पडला.

     यावेळी बोलताना किशोरभाई जैन म्हणाले की, “संजय काकडे आज सेवेतून निवृत्त होत असले तरी त्यांचे सामाजिक व कामगार क्षेत्रातील कार्य पुढेही सुरू राहील. त्यांच्या कार्याचा होत असलेला गौरव हीच त्यांच्या यशाची खरी पावती आहे.”


कार्यक्रमाच्या प्रारंभी संजय काकडे यांचे वडील कै. मधुकर (आण्णा) काकडे यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर संजय काकडे व त्यांच्या पत्नी, नागोठणे ग्रामपंचायत सदस्या सुप्रिया काकडे यांचे औक्षण करून व्यासपीठावर स्वागत करण्यात आले. केक कापून कार्यक्रमास सुरुवात झाली. या समारंभा प्रसंगी अनेक मान्यवरांनी संजय काकडे यांचे भरभरून कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी रिलायन्स कंपनीचे अध्यक्ष शशांक गोयल यांनी संजय काकडे यांच्याबद्दल भावना व्यक्त करताना सांगितले की, “संजय काकडे हे माझे मित्र आहेत. अडचणीच्या काळात जो आपल्या पाठीशी उभा राहतो तोच खरा मित्र असतो. त्यांनी कंपनीला वेळोवेळी सहकार्य केले असून भविष्यातही त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ आम्ही घेत राहू.”

        समारंभास राष्ट्रवादीचे नेते दिलीपभाई टके, किशोरभाई जैन, रिलायन्स नागोठणे युनिट अध्यक्ष शशांक गोयल, रिलायन्सचे अधिकारी कौशिक चक्रवर्ती, श्रीकांत गोडबोले, शैलेजा सिंग, अजिंक्य पाटील, माजी सरपंच तथा नागोठणे लायन्स क्लब अध्यक्ष विलास चौलकर, पहिले लोकनियुक्त सरपंच डॉ. मिलिंद धात्रक, डॉ. मिताली धात्रक, डॉ. सनी राजेंद्र धात्रक, पत्नी सुप्रिया काकडे, आई आशालता काकडे, मुलगा सिद्धेश काकडे, मुलगी वेदिका काकडे, घिसूशेठ जैन, बाळासाहेब टके, शैलेश रावकर, प्रकाश मोरे, नितीन पत्की, कामगार नेते के. टी. शिर्के, चंद्रकांत अडसूळे, नंदकुमार कोळी, अशोक भोय यांच्यासह अनेक मान्यवर, कुटुंबीय व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी संजय काकडे यांनी कंपनी, अधिकारी, सहकारी कामगार, मित्रपरिवार व कुटुंबीयांचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन गट शिक्षण अधिकारी, पनवेल निंबाजी गिते यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!