नागोठणेतील श्री कानिफनाथ मंदिरात नवीन देवमूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

नागोठणेतील श्री कानिफनाथ मंदिरात नवीन देवमूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

नागोठणे (शामकांत नेरपगार) – नागोठणे येथील मराठाआळी परिसरातील श्री कानिफनाथ मंदिरात नवीन देवमूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन दि. २१ व २२ जून २०२६ रोजी मोठ्या भक्तिभावाने व उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. दोन दिवस चाललेल्या या पवित्र धार्मिक सोहळ्यात मराठाआळी तसेच केएमजी विभागातील ग्रामस्थांसह परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवदर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला.
          मराठाआळी ग्रामस्थ तसेच केएमजी विभाग नागोठणे यांच्या वतीने या सोहळ्याचे अतिशय शिस्तबद्ध व नियोजनबद्ध आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात रविवार दि. २१ जून रोजी सायंकाळी ४ वाजता नागोठणेचे ग्रामदैवत श्री जोगेश्वरी मातेचे दर्शन घेऊन करण्यात आली. त्यानंतर नवीन देवमूर्तींची भव्य मिरवणूक वाजतगाजत मराठाआळी व केएमजी विभागातून श्री कानिफनाथ मंदिराकडे रवाना झाली.

             मंदिरात आगमनानंतर धान्याधिवास, जलाधिवास, शय्याधिवास तसेच धर्मध्वज पूजन यांसारखे विविध धार्मिक विधी पार पडले. सोमवार दि. २२ जून रोजी सकाळी द्वारपाल पूजन, मंदिर प्रवेश, विधान पूजन, महाअभिषेक व यज्ञकर्म आदी धार्मिक कार्यक्रम पार पडले.दुपारी १२ वाजता वेदोक्त पुरोहित श्री. शैलेश स्वामी, वेदोक्त आचार्य श्री. निखिल शास्त्री व सहकाऱ्यांच्या मंत्रोच्चारात विधिवत पूजा-अर्चा व होमहवन करून नवीन देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यानंतर पूर्णाहुती, महाआरती, नवनाथांवरील प्रवचन, हरिपाठ व महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला. सायंकाळी ह.भ.प. भगवान महाराज कदम सर यांचे प्रवचन झाले. त्यानंतर गायक प्रफुल नागोठणेकर, तबला वादक कौस्तुभ दिवेकर व सहकाऱ्यांसह श्री स्वामी समर्थ प्रासादिक भजन मंडळ, नागोठणे यांच्या सुरेल भजनांनी भाविकांना मंत्रमुग्ध केले. रात्री महाप्रसादानंतर या धार्मिक सोहळ्याची सांगता करण्यात नागोठणेतील श्री कानिफनाथ मंदिरात नवीन देवमूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

              हा सोहळा यशस्वी करण्यासाठी समस्त ग्रामस्थ, महिला मंडळ, मराठाआळी तसेच केएमजी विभाग नागोठणे येथील ग्रामस्थ व महिला मंडळ यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!