डी. फार्म परीक्षेत भारतीय एज्युकेशन सोसायटी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीची दमदार कामगिरी; विद्यार्थ्यांनी फडकावला यशाचा झेंडा

डी. फार्म परीक्षेत भारतीय एज्युकेशन सोसायटी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीची दमदार कामगिरी; विद्यार्थ्यांनी फडकावला यशाचा झेंडा

नागोठणे (शामकांत नेरपगार ) – भारतीय एज्युकेशन सोसायटी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, नागोठणे येथील विद्यार्थ्यांनी नुकत्याच जाहीर झालेल्या डिप्लोमा इन फार्मसी (डी. फार्म) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक परंपरेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे.
               प्रथम वर्ष डी. फार्म परीक्षेत संस्थेचा एकूण निकाल ८८ टक्के लागला. यामध्ये विघ्नेश राजेश खर्साईकर यांनी ८४.४० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. सौरभ दिनेश गुप्ता यांनी ८२.४० टक्के गुणांसह द्वितीय, तर आर्यन अंकुश दबडे यांनी ७९.१० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळविला.
             द्वितीय वर्ष डी. फार्म परीक्षेत संस्थेचा एकूण निकाल ७८ टक्के लागला. यामध्ये मनाली एच. मांडवकर यांनी ८६.०९ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळविला. पुरुषोत्तम एस. म्हात्रे यांनी ८२.०९ टक्के गुणांसह द्वितीय, तर जिविका जे. धामणसे यांनी ८१.८२ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला.
            विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किशोरभाई जैन, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिक जैन, प्राचार्य डॉ. आशिष पगारिया, विभागप्रमुख सौ. अनघा सामंत तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
             विद्यार्थ्यांची अथक मेहनत, पालकांचे सहकार्य आणि शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन यामुळे हे यश शक्य झाले असल्याचे सांगून, संस्थेचे विद्यार्थी भविष्यात फार्मसी क्षेत्रात उत्तुंग यश संपादन करून संस्थेचे नाव अधिक उज्ज्वल करतील, असा विश्वास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किशोरभाई जैन यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!