रोहा फाटा-वेलशेत येथे ‘हॉटेल अनिका चायनीज कॉर्नर’चा शानदार शुभारंभ; चविष्ट खाद्यपदार्थांना खवय्यांची पसंती

रोहा फाटा-वेलशेत येथे ‘हॉटेल अनिका चायनीज कॉर्नर’चा शानदार शुभारंभ; चविष्ट खाद्यपदार्थांना खवय्यांची पसंती

नागोठणे रायगड ( शामकांत नेरपगार ) – : नागोठणेजवळील रोहा फाटा, वेलशेत येथे ‘हॉटेल अनिका चायनीज कॉर्नर’ या नव्या व्हेज-नॉनव्हेज हॉटेलचा नुकताच उत्साहपूर्ण वातावरणात शानदार शुभारंभ संपन्न झाला.
शुभारंभ प्रसंगी बाळसई येथील प्रसिद्ध पुरोहित प्रशांत जंगम बुवा यांच्या हस्ते शुभम गंगाराम पारंगे व सौ. वर्षी शुभम पारंगे या उभयतांकडून विधिवत पूजा-अर्चा व गणेशपूजन करण्यात आले. नव्या व्यवसायास उत्तरोत्तर भरभराट लाभावी, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.


हॉटेलमध्ये विविध प्रकारचे चायनीज खाद्यपदार्थ, स्पेशल मटण थाळी, चिकन थाळी तसेच व्हेज थाळी उपलब्ध असून, सुरुवातीपासूनच चविष्ट पदार्थांमुळे खवय्यांची मोठी गर्दी होत आहे. स्वच्छ, टापटीप वातावरण आणि दर्जेदार सेवा यामुळे ग्राहकांकडूनही हॉटेलचे कौतुक होत आहे.
या शुभारंभ सोहळ्याला हॉटेलचे मुख्य संचालक व वेलशेत-नागोठणे येथील सामाजिक कार्यकर्ते गंगाराम पारंगे, सौ. सुवर्णा गंगाराम पारंगे, शुभम गंगाराम पारंगे, सौ. वर्षी शुभम पारंगे, पडम (रोहा) येथील युवा सामाजिक कार्यकर्ते आशिष चौलकर, तसेच वेलशेत ग्रामस्थ, हितचिंतक आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्राहकांच्या सोयीसाठी घरपोच सेवेची सुविधाही उपलब्ध करण्यात आली असून, अधिक माहितीसाठी गंगाराम पारंगे (मो. 9833120484), शुभम पारंगे (मो. 8552810660) किंवा आशिष चौलकर (मो. 9359319853) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!