खा. सुनील तटकरेंच्या माध्यमातून नागोठण्यात पुन्हा विकासाची गंगा वाहणार – किशोरभाई जैन नागोठणे शहर व पंचक्रोशीतील विविध समस्यांबाबत खासदार सुनील तटकरे यांना निवेदन; विकासकामांसाठी शासनस्तरावर पाठपुराव्याचे आश्वासन

खा. सुनील तटकरेंच्या माध्यमातून नागोठण्यात पुन्हा विकासाची गंगा वाहणार – किशोरभाई जैन

नागोठणे शहर व पंचक्रोशीतील विविध समस्यांबाबत खासदार सुनील तटकरे यांना निवेदन; विकासकामांसाठी शासनस्तरावर पाठपुराव्याचे आश्वासन

नागोठणे रायगड (शामकांत नेरपगार) – नागोठणे शहर व पंचक्रोशीतील विविध प्रलंबित समस्या, विकासकामे तसेच स्थानिक नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अलिबाग येथील हॉटेल ताज येथे रायगडचे खासदार तथा भारत सरकारच्या पेट्रोलियम व नैसर्गिक वायू क्षेत्राशी संबंधित जबाबदारी असलेले लोकनेते खासदार सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते किशोरभाई जैन, दिलीपभाई टके व नागोठण्यातील कार्यकर्ते यांनी भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. यावेळी नागोठणे परिसरातील विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. त्यानंतर खा. सुनील तटकरेंच्या माध्यमातून नागोठण्यात पुन्हा विकासाची गंगा वाहणार असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते किशोरभाई जैन यांनी व्यक्त केला.
               नागोठणे व पंचक्रोशीतील रस्ते, वाहतूक व्यवस्था, पाणीपुरवठा, वाढती गुन्हेगारी, स्थानिक तरुणांचा रोजगाराचा प्रश्न तसेच रिलायन्स पेट्रोकेमिकल कंपनीच्या वाहतुकीमुळे निर्माण होणाऱ्या विविध समस्यांबाबत निवेदनातून खासदार सुनील तटकरे यांचे लक्ष वेधण्यात आले. तसेच स्थानिक नागरिकांच्या हिताशी संबंधित विविध विषयांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली.
              नागोठणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध विकासकामांचे प्रस्तावही यावेळी मांडण्यात आले. स्थानिक नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी तसेच विकासकामांना गती देण्यासाठी शासनस्तरावर योग्य तो पाठपुरावा करण्याचे सकारात्मक आश्वासन खासदार सुनील तटकरे यांनी दिले.
यावेळी आमदार अनिकेतभाई तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किशोरभाई जैन, दिलीपभाई टके, नागोठणे सरपंच सुप्रिया महाडिक, माजी उपसरपंच अखलाख पानसरे, ग्रामपंचायत सदस्य ॲड. प्रकाश कांबळे, अमृता महाडिक, विनीता पाटील, भाविका गिजे, धनंजय जगताप यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
विकासकामांच्या प्रस्तावांवर किशोरभाई जैन यांची सविस्तर चर्चा
              नागोठण्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून विविध महत्त्वपूर्ण उपक्रम, नवनवीन विकासकामे तसेच विविध प्रस्तावांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते किशोर जैन यांनी खासदार सुनील तटकरे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. नागोठण्याच्या विकासासाठी मांडण्यात आलेल्या या प्रस्तावांना खासदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होईल आणि प्रलंबित विकासकामांना लवकरच गती मिळेल, असा विश्वास किशोरभाई जैन यांनी व्यक्त केला.
             खा. सुनील तटकरे यांच्या माध्यमातून नागोठण्यात पुन्हा विकासाची गंगा वाहणार असून शहर व पंचक्रोशीच्या विकासाला निश्चितच चालना मिळेल असा विश्वास किशोर जैन यांनी यावेळी व्यक्त केला.
                नागोठणे शहर व पंचक्रोशीतील नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडविण्यासोबतच आवश्यक विकासकामे मार्गी लावण्यासाठी पुढील काळात शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!