16 व्या राज्यस्तरीय पिंच्याक सिल्याट स्पर्धेत रायगडची दमदार कामगिरी; 19 सुवर्णांसह तिसऱ्या क्रमांकावर झेप : 19 सुवर्ण, 12 रौप्य व 8 कांस्य पदकांची कमाई; राज्यातील 22 जिल्ह्यांमधील 430 खेळाडूंमध्ये रायगडचा दबदबा

16 व्या राज्यस्तरीय पिंच्याक सिल्याट स्पर्धेत रायगडची दमदार कामगिरी; 19 सुवर्णांसह तिसऱ्या क्रमांकावर झेप :
19 सुवर्ण, 12 रौप्य व 8 कांस्य पदकांची कमाई; राज्यातील 22 जिल्ह्यांमधील 430 खेळाडूंमध्ये रायगडचा दबदबा

नागोठणे ( शामकांत नेरपगार ) – नाशिक येथे 11 ते 13 जून 2026 दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या 16 व्या राज्यस्तरीय पिंच्याक सिल्याट स्पर्धेत रायगड जिल्ह्याच्या खेळाडूंनी उल्लेखनीय यश संपादन करत एकूण 19 सुवर्ण, 12 रौप्य आणि 8 कांस्य पदके मिळवून राज्यात तिसऱ्या क्रमांकाचे मानाचे स्थान पटकावले.
               इंडियन पिंच्याक सिल्याट फेडरेशनच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र पिंच्याक सिल्याट असोसिएशनतर्फे सर्वेश्वर महादेव ट्रस्टच्या इनडोअर हॉल, तपोवन (नाशिक) येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातील 22 जिल्ह्यांतील सुमारे 430 खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेतला होता.
स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभास नाशिक महानगर भारतीय जनता युवा मोर्चा नाशिक महानगर अध्यक्ष अमोल बाळासाहेब पाटील, इंडियन पिंच्याक सिल्याट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष किशोर येवले, सुरेखा येवले, रायगड जिल्हा पिंच्याक सिल्याट सचिव धनंजय जगताप यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
                 या स्पर्धेत ठाणे जिल्ह्याने 35 सुवर्ण, 10 रौप्य व 3 कांस्य पदके जिंकून प्रथम क्रमांक मिळवला, तर सांगली जिल्ह्याने 23 सुवर्ण, 8 रौप्य व 6 कांस्य पदकांसह द्वितीय स्थान पटकावले. रायगड जिल्ह्याने 19 सुवर्ण, 12 रौप्य व 8 कांस्य पदकांसह तिसरे स्थान मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली.
रायगड जिल्ह्यातील 30 खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. यामध्ये रियांश सारले (2 सुवर्ण), जय शेखर गोळे (1 सुवर्ण), श्रीशा रेवले (1 सुवर्ण), शौर्य वाघमारे (1 सुवर्ण), श्रीयश शेडगे (1 सुवर्ण), प्रांजळ खारपुडे (1 सुवर्ण), प्रीत माळी (1 सुवर्ण), राकेश पवार (1 सुवर्ण), शिवशांत सारगे (2 सुवर्ण), अनिश पालकर (2 सुवर्ण) आणि नेहा दोरे (3 सुवर्ण), श्रेयश शेडगे ( 2 सुवर्ण ) यांच्यासह अन्य खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत रायगडच्या यशात मोलाचा वाटा उचलला.
            रायगडच्या या यशाबद्दल खेळाडू, प्रशिक्षक आणि पालकांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!