16 व्या राज्यस्तरीय पिंच्याक सिल्याट स्पर्धेत रायगडची दमदार कामगिरी; 19 सुवर्णांसह तिसऱ्या क्रमांकावर झेप :
19 सुवर्ण, 12 रौप्य व 8 कांस्य पदकांची कमाई; राज्यातील 22 जिल्ह्यांमधील 430 खेळाडूंमध्ये रायगडचा दबदबा
नागोठणे ( शामकांत नेरपगार ) – नाशिक येथे 11 ते 13 जून 2026 दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या 16 व्या राज्यस्तरीय पिंच्याक सिल्याट स्पर्धेत रायगड जिल्ह्याच्या खेळाडूंनी उल्लेखनीय यश संपादन करत एकूण 19 सुवर्ण, 12 रौप्य आणि 8 कांस्य पदके मिळवून राज्यात तिसऱ्या क्रमांकाचे मानाचे स्थान पटकावले.
इंडियन पिंच्याक सिल्याट फेडरेशनच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र पिंच्याक सिल्याट असोसिएशनतर्फे सर्वेश्वर महादेव ट्रस्टच्या इनडोअर हॉल, तपोवन (नाशिक) येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातील 22 जिल्ह्यांतील सुमारे 430 खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेतला होता.
स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभास नाशिक महानगर भारतीय जनता युवा मोर्चा नाशिक महानगर अध्यक्ष अमोल बाळासाहेब पाटील, इंडियन पिंच्याक सिल्याट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष किशोर येवले, सुरेखा येवले, रायगड जिल्हा पिंच्याक सिल्याट सचिव धनंजय जगताप यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेत ठाणे जिल्ह्याने 35 सुवर्ण, 10 रौप्य व 3 कांस्य पदके जिंकून प्रथम क्रमांक मिळवला, तर सांगली जिल्ह्याने 23 सुवर्ण, 8 रौप्य व 6 कांस्य पदकांसह द्वितीय स्थान पटकावले. रायगड जिल्ह्याने 19 सुवर्ण, 12 रौप्य व 8 कांस्य पदकांसह तिसरे स्थान मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली.
रायगड जिल्ह्यातील 30 खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. यामध्ये
🥇सुवर्ण पदक विजेते🥇
- रियांश सारले, जय गोळे, श्रीशा रेवले, शौर्य वाघमारे, श्रीयश शेडगे, प्रांजळ खारपुडे, प्रीत माळी, राकेश पवार, शिवशांत सारगे, अनिश पालकर, नेहा दोरे, श्रेयश शेडगे, रोहित गायकवाड, अनुज सरनाईक.
-
🥈 रौप्य पदक विजते 🥈
- मयंक नाकते,हर्ष पाटील,सर्वांश सारले,शौर्य धसाडे,जय कुलकर्णी ,प्रांजळ खारपुडे,अनिश पालकर,पीयूष साळुंखे,ओमकार साळुंखे, श्रेयश शेडगे,प्रशांत सारगे,रोहित गायकवाड.
🥉कास्य पदक विजेते🥉
- हनी मोदी, श्रीयश शेडगे,शौर्य धसाडे,अभिरुद्रप्रताप राय,आदर्श पटेल,अंश म्हात्रे,अर्णव वादळ,प्रशांत सारगे,जय गोळे या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत रायगडच्या यशात मोलाचा वाटा उचलला.
रायगडच्या या यशाबद्दल खेळाडू, प्रशिक्षक आणि पालकांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

