नागोठण्यात पर्युषण पर्वारंभानिमित्त भगवान श्री चंद्रप्रभू स्वामीजींची भव्य पालखी भक्तिभावात

नागोठण्यात पर्युषण पर्वारंभानिमित्त भगवान श्री चंद्रप्रभू स्वामीजींची भव्य पालखी भक्तिभावात

नागोठणे रायगड (शामकांत नेरपगार) : जैन धर्मीयांच्या पवित्र पर्युषण महापर्वाच्या प्रारंभानिमित्त नागोठणे येथे जैन तीर्थंकर भगवान श्री चंद्रप्रभू स्वामीजींच्या भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. भक्तिभावपूर्ण आणि मंगलमय वातावरणात हा धार्मिक सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

               नागोठणे येथील जैन मंदिरातून भगवान श्री चंद्रप्रभू स्वामीजींच्या पालखीचे विधिवत प्रस्थान झाले. संपूर्ण नागोठणे शहरातून पालखीची प्रदक्षिणा काढण्यात आली. यावेळी जैन समाजबांधवांनी मोठ्या भक्तिभावाने पालखी सोहळ्यात सहभागी होत भगवान श्री चंद्रप्रभू स्वामीजींचे दर्शन व आशीर्वाद घेतले. पालखी पुन्हा जैन मंदिरात आल्यानंतर धार्मिक वातावरणात सोहळ्याची सांगता झाली.
             या मंगलमय प्रसंगी राष्ट्रवादीचे नेते किशोरभाई जैन, नरेंद्रशेठ जैन, नागोठणे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाशशेठ जैन, ज्वेलर्स असोसिएशन नागोठणेचे अध्यक्ष प्रविण जैन, नागोठणे उपसरपंच ज्ञानेश्वर साळुंखे, मोहन नागोठणेकर, अकलाख पानसरे, जुगनशेठ जैन, सोहनशेठ जैन, संतोष कावेडिया, बंटीशेठ जैन, अंकुश जैन, राकेश जैन आदी मान्यवरांसह असंख्य जैन बांधव उपस्थित होते.
             

                पालखी सोहळ्यादरम्यान संपूर्ण परिसरात भक्ती, अहिंसा, संयम आणि अध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते. पर्युषण पर्व हे आत्मशुद्धी, आत्मचिंतन, क्षमा, संयम आणि अहिंसेचा संदेश देणारे पवित्र पर्व मानले जाते. या पावन पर्वानिमित्त सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि सद्भावना नांदो, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!